पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा कशी आहे, किती आणि कोणत्या गाड्या आहेत त्यांच्या ताफ्यात आणि काळी बॅग मध्ये काय आहे. PM Narendra Modi Security Details.
Get free update on Whatsapp |
५ जानेवारी पंजाबमध्ये आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा अडवला त्यावेळीसुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा ताफा पुढे जाऊन देने हे योग्य नसल्यामुळे पंजाबमधील सभा रद्द करण्यात आली. तर मोदींनी मी भाटिण्ड विमानतळावर सुखरूप पोहोचलो असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी चर्चा निर्माण झाल्या आणि त्याविषयी चर्चा झाल्या तर आपण पाहू पंतप्रधानची सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे असते आणि कश्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था असते त्याबद्दल माहिती घेऊ.
महाराष्ट्र पोस्ट विभागात मोठी भरती
भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंब यांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG(विशेष संरक्षण गट) म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पंतप्रधान चालत असताना, सभा सांगत असताना, गाडीमध्ये त्यांच्या सोबत जे काळ्या कपड्यांमध्ये असतात ते SPG कमांडो असतात पंतप्रधान जिथे जातील तेथे ते सुरक्षा रक्षक असतात.
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षा राक्षकाने केल्यानंतर पंतप्रधानची सुरक्षा हा मुद्धा खूप चर्चेमध्ये आला होता. त्यामुळे एप्रिल १९८५ मध्ये SPG विशेष संरक्षण ग्रुप ची स्थापना करण्यात आली. हा ग्रुप प्रामुख्याने पंतप्रधान यांच्या सुकक्षेच्या दृष्टीने बनवण्यात आला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञान, हत्यारे समाविष्ट आणि अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले जवान या ताफ्यात असतात. SPG जवानांची निवड तिन्ही सैन्यदलातील चांगली कामगिरी बाजवणाऱ्या जवानांना केली जाते. सध्या भारतात पंतप्रधानांचा सुरक्षा ताफ्यामध्ये ३००० जवान कार्यरत आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सुरक्षा हे जवान पार पाडतात. पंतप्रधान यांच्या निवास स्थानाच्या आजूबाजूला जवळपास ५०० कमांडो नियुक असतात. SPG चे निवडक प्रशिक्षित रायफल नेमबाज पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या ठिकाणी उपस्थिती असतात. पंतप्रधान कुठेही जाणार असतील तर त्यांच्या जाण्याचे दोन रस्ते ठरवण्यात आलेले असतात. ते कोणत्या रस्त्याने जाणार आहेत फक्त SPG लाच माहीत असते. तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये राज्य पोलीस दलाचा सुद्धा महत्वाचा वाटा असतो राज्य पोलिस आणि SPG यांच्यामध्ये ताळमेळ असणे गरजेचे असते. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार आहेत तो रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची असते.
नुकतीच पंतप्रधान यांच्या ताफ्यात मर्सिडीज मे बॅक कार सामील करण्यात आली हा निर्णय एसपीजी चा होता. तसेच त्यांच्या ताफ्यामध्ये दोन बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू ७ सिरीज, ६ BMW X५s आणि एक मर्सिडीज बेंझ अंबुलन्स आणि १५ हुन जास्त वाहने त्यांच्या सुरक्षेसाठी असतात. हल्लेखोरांना चकवा देण्यासाठी ताफ्यासोबत २ डमी कार सुद्धा असतात. त्यासोबत टाटा सफारी जॅमर सुद्धा ताफ्यासोबत असते. पंतप्रधान जेव्हा रस्त्याने जात असतात तेव्हा त्यांच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे राज्य पोलीस असतात. त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी वाहने असतात.
पंतप्रधान जेव्हा २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ला जेव्हा भाषण देणायसाठी येतात तेव्हा त्यांच्यासोबत जे कमांडो असतात त्यांच्या हातात एक लॅपटॉप बसेल अशी बॅग असते. ती बॅग नसून त्याला पोर्टबल बालस्टिक शिल्ड असते. कामांडोना पंतप्रधान वर कोणत्याही हल्ल्याची शंखा जरी आली तरी ती एका झटक्यात उगगडून पंतप्रधानची सुरक्षा करतात. त्यामध्ये एक कप्पा असतो त्यात एक रिव्हॉल्वर सुद्धा ठेवलेली असते.
Join Whatsapp Free- CLICK HERE
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!
Admin- Hindavi DM