आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक नाष्टा म्हणजे कांदेपोहे महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक राज्यात सुद्धा पोहे हाच नाष्टा असतो. लग्नाला मुलगी पाहायला गेलं तिथे सहसा पोहेच दिले जातात. पोह्याचा इतिहास पाहायला गेलं तर असे सांगतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रात लागला. पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रा सह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हेही दावा करतात की पोह्याचा शोध आमच्या इथेच लागला. पण पोहे हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. म्हणून सर्वात जास्त तांदूळ पिकतो आशा ठिकाणीच शोध लागला असेल असंच तज्ज्ञाच मत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदूळ पिकला जातो म्हणून पोहयचा शोध महाराष्ट्रात लागला असावा.
पोह्याचा उल्लेख आपण पहिला तर महाभारतात सुद्धा आढळून येतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदामाला त्याचा बायकोने त्याचा पुरचुंडीत पोहेच भरून दिले होते, आणि ते सुदम्याचे पोहे कन्ह्याने आवडीने खाल्ले. चौथी पाचवीत असताना तुम्ही सुदाम्याचे पोहे हा धडा अभ्यासाला असेलच. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्या आधी सुद्धा पोहे बनवले जात असणार हे नक्कीच फक्त त्यावेळी कांडा मिरची घालत नसतील. पुराणातील कथांमध्ये पोह्याचा उल्लेख आढळतो. तर भारतात पुरातन काळात प्रमुख नाश्ता म्हणून ओळखले जायचे. भारतातच नाही तर इंडोनेशिया, कंबोडिया, फिलिपिन्स या देशांमध्ये ही पोहे बनवले जातात फक्त त्याला तिथे नाव वेगळं आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या सैनिकांना इथलं वातावरण सूट होण्यासाठी त्यानां पण पचण्यासाठी हलका असणारे पोहेच दिले जात असतं. पुण्यातील एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या मुलांच्या नाश्त्याला फक्त हळद घालून केलेले पोहेच नशिबात असतात. तेच पोहे खाऊन आज काही विद्यार्थी मोठे अधिकारी आहेत. पण पुण्यामध्ये लोकं सांबर टाकून, चहा सोबत पोहे खातात. बनवायला सोपे असलेले पोहे मैगी पेक्षा जास्त पंधरा ते वीस मिनिटात बनतात.
तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला माहीत असेल नसेल झाले तर होईल माहीत. मुलगी पाहायला गेल्यावर पोहेच दिले जातात. कारण पोहे हे बनवायला सोपे आणि चविष्ट आणि पोहे बिघडण्याची शक्यता कमी असते शक्यतो बिघडत नाहीत आणि जरी थोडेफार बिघडले ओळखू येत नाहीत. आणि पाहुण्यांना सांगता येत पोहे मुलीने बनवले. मुलीला पाहायला आलेली मंडळीही खुश होतात. त्यामुळे लग्नाला मुलगी पाहायला गेल्यावर पोहे करतात. पण आत्ताच्या काळात विविध प्रकारचे पोहे आढळतात
मारवाड़ी पोहे
कांदा पोहे
बटाटा पोहे
गुजराती पोहे
आलू पोहे
इंदौरी पोहे
पोहे खाण्याचे फायदे:
● सकाळी पोह्याचा नाश्ता केला तर तुम्हाला ताकत येते त्यामुळे दिवसभर काम करू शकता.
● कांदेपोहे खायला चविष्ट आणि पोटासाठी हलका पदार्थ आहे.
● कांदेपोहे खाल्यानंतर ते आपल्या पोटात गेल्यावर अजून त्याचा आकार वाढतो, त्यामुळे पोट गच्च राहते.
● सकाळी नाश्त्यासाठी उत्तम उत्तम आहार समजला जातो.
● पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्नस पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि डी हे घटक प्रामुख्याने शरीरासाठी चांगले आहेत.
● वजन कमी करण्यासाठी पर्यायी आहार.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, नोकरी अपडेट, आरोग्य, मनोरंजन माहितीसाठी व्हाट्सऍपवर जॉईन करा. येथे क्लीक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!
Admin- Hindavi DM