आत्ताच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक किती फायद्याची आणि किती तोट्याची Gold Investment Details
सध्याच्या जमान्यात गुंतवणूक म्हणजे क्रिप्टो करन्सी आणि शेअर बाजार हे दोनच पर्याय जास्ती लोकांना माहीत आहे किंवा जास्त फायदेशीर आहेत अशी लोकांचा समज आहे. हेच तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते समजूनच घ्यायच नसत. त्यांच्या डोक्यात एकाच बसलेलं असतं म्हणजे गुंतवणूक म्हणजे सोन जसं आपलं गणितं पक्के तसं त्यांचं त्यांचं सुद्धा पक्के असतं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोन आजही शेअर मार्केट आणि क्रिप्टोच्या जमान्यात अजून ही पाय रोवून उभे आहे.
पहिली जशी सोन्यामध्ये गुंतवणूक होत होती. तशी आत्ताच्या जमान्यात का होत नाही. आत्ता च्या घडीला सोन्यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते का हेच आपण पाहूया.
ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आपण पाहिलं की सोन्याची दुकान बंद होती तसेच सर्व मार्केटसुद्धा बंदच होते. ज्याच्याजवळ सोनं होतं तो ते विकून थोडेफार पैसे हवे असतील तर तो विकुही शकत नव्हता, आणि ज्याला सोन खरेद करायचं तो खरेदी सुद्धा करू शकत नव्हता. त्यावेळी सर्वांच्या कामला आलं ते म्हणजे गोल्ड एटीएफ मुले सर्वाना दिलासा मिळालेला आ ढळतो. तुमच्यातील काही जणांना सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक खूप तोटा आहे असे वाटू शकते तर काही जणांना फायदेशीर आहे असे वाटू शकते. कारण काही जणांच्या घरामध्ये जेव्हा आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळेला तेच सोनं त्यांच्यांचासाठी फायदाच ठरलेलं आढळतं.
अर्थव्यवस्था जेव्हा संकटात येते तेव्हा सोन्याचे भाव वाढलेले आपल्याला दिसतील. मंदी आली शेअर बाजारात उतार चढाव झाले तरी सोन्याच्या दरात असा काही जास्त फरक आपल्याला आढळून येत नाही. बऱ्यापैकी सर्वाना माहिती आहे सोन्याचे भाव जास्त उतरत नाहीत.
सोन्याचे दागिने आणि सोन्याची गुंतवणूक:
आपण सोन्याचे दागिने केले म्हणजे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली अस समजतो तसं नसते ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
● समजा तुमच्याकडे कॅश आहे त्या कॅशमधून तुम्ही सरकारी बॉण्ड किंवा शेअर विकत घेतले. काही कालावधी नंतर त्याची भाव वाढ झाली आणि तुम्हाला जर वाटलं की यामध्ये पाहिजे तेवढा नफा मिळतोय तर तुम्हाला परत कॅश भेटते.
● पण सोन्याच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी आहे, तुमच्याकडे कॅश आहे आणि तुम्ही त्याचे सोन्याचे दागिने किंवा बिस्किटे खरेदी केले. तर ते आपण जोपर्यंत विकत नाही जोपर्यंत आपल्यावर एखादं आर्थिक संकट येत नाही.
● सोन्याचा भाव वाढला म्हणून सोनं विकल असा एखादा माणूस तुम्हला शोधून सापडणार नाही.
● शेअरर्स भाव वाढले तर आपण विकतो एखाद्यला सांगितले की भाव वाढले म्हणून मी शेअर विकले तो वाहवाह करेल.
● सोन्याचे भाव वाढले म्हणून सोन विकल असं घरात सांगून बघा, सोन्याचे दागिने सोन्यामदली गुंत8माही तर ही भावनिक गरज असलेले आपल्याला पाहायला मिळेल.
● जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही सोने खरेदी विक्री करू शकता फक्त किमती वेगवेगळ्या असतील.
● सोन्याचं नाणं तुम्ही खरेदी करायला गेला तर त्यावेळी त्याचा दर वेगळा असतो आनि जेव्हा ते विकायला जाता तेव्हा दरामध्ये १० ते १५ टक्के कमी झालेली आपल्याला दिसते. ही कपात झालेली वाचावी त्यासाठी गोल्ड एटीएफ ही सुविधा निर्माण केली गेली.
● गेल्या २ वर्षात सोन्याचा जास्तीत जास्त ५६००० भाव झालेला आपण पहिला असेल. आणि कमीतकमी ४५००० पण झाला. आणि आत्ताच्या घडीला ४९५०० आहे.
● भारतात वार्षिक सोन्याची मागणी ८०० ते १००० टनाच्या आसपास आहे.
तुम्ही कित्येक जणांना विचारा सोन्यामध्ये गुंवणूक फायदेशीर का तोटा तो त्याच्या पध्द्तीने उत्तर देईल. पण शेअर मध्ये लाखाचे बारा झालेले तुम्ही पाहिले असेल. पण सोन्यामध्ये तसं नक्कीच होतं नाही हे नक्कीच.
✍🏻हे पण वाचा;
Follow Hindavi Magazine
Source:
https://www.nseindia.com
https://www.etmoney.com
https://sbi.co.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!
Admin- Hindavi DM